अशी टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे यांनी संवाद दौऱ्यात केली
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I सावदा - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकासकामांची गाजलेली ओळख असतानाही विद्यमान लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याची टीका महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे यांनी केली. आजच्या मतदार संवाद दौऱ्यादरम्यान रोहिणी खडसे यांनी निवडणुकीचे महत्त्व स्पष्ट करताना विश्वास व्यक्त केला की, त्या सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक पदभरती, औषधपुरवठा आणि आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देऊन गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार देणार आहेत.
प्रचार दौऱ्याच्या प्रारंभात माजी आमदार स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर गावात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत रोहिणी खडसे यांचे आणि महाविकास आघाडीचे स्वागत केले. यावेळी मतदारांनी रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला.
रोहिणी खडसे यांनी सांगितले की, "आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावागावात शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि इतर मुलभूत सुविधांचा विकास झाला. तथापि, मागील पाच वर्षांमध्ये मतदारसंघाच्या विकासात मागे पडले असून, जातीय तेढ निर्माण करून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे." त्यांनी या समस्यांचा निवारण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बहुमताने निवडून येण्याचे आवाहन केले.
माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांनी देखील त्यांच्या भाषणात आ. एकनाथराव खडसे यांच्या विकास कार्याची प्रशंसा केली. "विरोधक गेल्या तीस वर्षांतील योगदानाबद्दल प्रश्न विचारत आहेत, पण त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की एकनाथराव खडसे यांनी डांबरी रस्ते, पुलांची निर्मिती केली, आणि गावागावांमध्ये मुलभूत सुविधांचे निर्माण केले," असे दिपक पाटील म्हणाले.
किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी मतदारसंघातील सावदा ग्रामीण रुग्णालयाची स्थिती स्पष्ट केली. "ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी, विद्यमान लोकप्रतिनिधींकडून यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कर्मचारी भरतीची अनदेखी झाली आहे," अशी टीका त्यांनी केली. त्यांनी आश्वासन दिले की, रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली या रुग्णालयात सर्व आवश्यक सेवा कार्यान्वित केल्या जातील.
यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये माजी पं.स. सदस्य दिपक पाटील, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा