Top News

डॉ. संभाजीराजे पाटील यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद: विरोधकांच्या चिंतेत भर


एरंडोल विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना मतदारांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून, आगामी निवडणुकीत त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एरंडोल विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे पारोळा येथील डॉ. संभाजीराजे पाटील हे त्यांच्या सामाजिक कार्याने मतदारांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. पाटील यांनी गेल्या २-३ वर्षांत मतदार संघातील सर्वसामान्य जनतेशी संपर्क वाढवून अनेक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरांपासून ते गरजूंना वैयक्तिक मदत करण्यापर्यंतच्या त्यांच्या कार्यामुळे मतदार संघात त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

डॉ. पाटील यांनी रोजगार, सिंचन, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आपली उमेदवारी मांडली आहे. त्यामुळे मतदार संघात बदलाची हवा असल्याचे बोलले जात आहे, आणि डॉ. पाटील हेच मतदार संघाला नवा चेहरा देऊ शकतील, असा मतदारांचा विश्वास आहे.

सरकारी पातळीवरील त्यांच्या ओळखीमुळे मतदार संघाला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधक चिंतेत असून, येत्या निवडणुकीत डॉ. पाटील यांना मिळणारा प्रतिसाद त्यांचे विजयाचे दरवाजे उघडू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने