Top News

चिंचोली शिरसोली गटातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश


गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चिंचोली शिरसोली गटातील कार्यकर्त्यांनी देवकर आप्पा यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात सामील होण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या समारंभात ग्रामपंचायत सदस्य आनंद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सोपान मानकर, अजय वाघ, आशुतोष घुगे व इतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. पक्षीय ध्येय-धोरणे, शरद पवार साहेबांची विचारधारा आणि देवकर आप्पा यांचं नेतृत्व यावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर हा मोठा राजकीय बदल मानला जात असून, आगामी निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्यांच्या सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीत वाढ होणार आहे.

या पक्षप्रवेशामुळे चिंचोली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देवकर आप्पा यांच्या सहकार्याने या गटातील विकासाच्या दिशा ठरविण्याचे आणि एकत्रितपणे काम करण्याचे निर्धार नव्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने