१३ देशांतील १५५० विद्यार्थ्यांमध्ये इकरा युनानी महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांनी टॉप १० मध्ये मिळवले स्थान; महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I IUF इंटरनॅशनल युनानी फोरमच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी इंटरनॅशनल ऑनलाईन क्वीझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १३ देशांमधून १५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या ६ विद्यार्थ्यांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे.
विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष इकरा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अब्दुल करीम सालार होते. तसेच, प्रोफेसर जफर शेख, अ. रशिद शेख, गुलाम नबी बागवान, अब्दुल अजिज सालार, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. इकबाल शेख, डॉ. नसिम अन्सारी, डॉ. अनीस शेख, डॉ. समीना खान आणि डॉ. सुमैय्या शेख यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला.
या कार्यक्रमात दुसऱ्या क्रमांकावर सय्यद अरविश, तिसऱ्या क्रमांकावर शेख हुमेरा, चौथ्या क्रमांकावर खान अदनान, पाचव्या क्रमांकावर कामरान फैसल, सहाव्या क्रमांकावर मिर्जा उवैस आणि नवव्या क्रमांकावर खान लुईजा यांनी स्थान मिळवले. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार आणि इतर सदस्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या यशाचे अभिनंदन करण्यात आले.
इकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या या विशेष यशामुळे महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल झाले आहे, असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
टिप्पणी पोस्ट करा