जळगाव अपडेट न्यूज ची बातमी ठरली खरी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करीत आहे मात्र जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठी फूट पडली आहे.
जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून अंतर्गत वाद सुरू होते मात्र अचानक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेने आयात उमेदवार करून त्यांना मनसेची उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी पसरली होती त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जळगाव शहरातील मनसेमध्ये फूट पडली आहे महानगर उपाध्यक्ष यांच्यासह पंधरा ते वीस पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात दाखल होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
टिप्पणी पोस्ट करा