Top News

जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई: विजेच्या तार चोरी करणारा आरोपींना अटक


जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील विजेच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपीकडून ५ गुन्हे उघड; १.५ लाख रुपये किमतीच्या ३८०० मीटर लांबीचा तार हस्तगत 

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील विजेच्या तारांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. या अनुषंगाने, जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कासोदा आणि एरंडोल परिसरातील शेत शिवारात विजेच्या तार चोरी करणारे संशयित इसम शोधले आणि त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विजेच्या तार चोरी केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींची नावे रविंद्र अनिल मिस्तरी (३८, साई नगर, एरंडोल), धनराज प्रकाश ठाकुर (४६, अमळनेर दरवाजा, एरंडोल), आणि समाधान नारायण पाटील (४५, नारायण नगर, एरंडोल) अशी आहेत.

या आरोपींवर एकूण ५ गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून १.५ लाख रुपयांच्या ३८०० मीटर विजेच्या तारांची जप्ती करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने