Top News

जळगाव जिल्ह्यात युवा बास्केटबॉल संघाची २७ रोजी निवड चाचणी




महा बास्केटबॉल संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी I
  महा बास्केटबॉल संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद (युवा गट) स्पर्धेचे आयोजन दि. ११ ते १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दरम्यान नागपूर शिवाजीनगर जिमखाना येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा संघ देखील सहभागी होणार आहे.

यासाठी जिल्हा युवा मुले व मुलींच्या संघांची निवड चाचणी रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भूसावळ येथील बास्केटबॉल मैदानावर घेण्यात येणार आहे.  निवड झालेल्या खेळाडूंमधून १२ मुले व १२ मुली नागपूर येथील स्पर्धेसाठी व ४ मुले व ४ मुली माटुंगा जिमखाना, मुंबई येथे बी.एफ.आय. मार्फत आयोजित निवड चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

निवड चाचणीसाठी खेळाडूचे वय ०१/०१/२००८ व त्यापुढील असणे आवश्यक असून, खेळाडूंनी सोबत आधारकार्ड प्रत, जन्म दाखला प्रत, व प्रति खेळाडू रु. १००/- नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे. याशिवाय, जिल्ह्यातील इच्छुक बास्केटबॉल पंचांची निवड करून नागपूर येथे होणाऱ्या स्पर्धेदरम्यान पंच शिबीर व परीक्षेसाठी पाठविण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.  सर्व खेळाडूंची उपस्थिति सकाळी ९.३० वाजता असावी. जितेंद्र शिंदे (प्र.सचिव), विनय काळे - ८८०६१७८८९३, आशीष पाटील ७२७६७८१२१२यांच्याशी संपर्क करावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने