Top News

राजुमामा भोळे यांचा सर्वाधित मतांनी विजय निश्चित, गिरीश महाजन यांचा विश्वास

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जम्बो यादी जाहीर 

जळगाव अपडेट न्युज निखिल वाणी I जळगाव शहर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने व्यवस्थापन समितीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर केली आहे. या संदर्भात आज जी. एम. फाउंडेशन येथील भाजपा कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार बन्सीलालजी गुजर व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची तयारीची चर्चा करण्यात आली.

गिरीशभाऊ महाजन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, जळगाव शहरातून आ. सुरेश भोळे (राजु मामा) यांना मागील निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याच्या अनुभवाच्या आधारावर यावेळीही एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच, कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार जोरात करण्याचे निर्देश दिले आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

या बैठकीत जळगाव लोकसभेचे प्रभारी डॉ. राध्येशाम चौधरी, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने