Top News

जळगावात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील विधानसभेच्या रिंगणात

जनतेचा विश्वास व विकासाचं वचन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगावच्या माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरात महत्त्वपूर्ण विकासकामे पार पाडण्यात आली असून, त्यांनी नागरिकांच्या हितासाठी केलेली कामगिरी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, व पाण्याच्या समस्यांवर काम करणारे नेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी माजी उपमहापौर म्हणून शहराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास दृढ झाला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही ते त्यांच्या कामाच्या जोरावर जनतेसमोर जाणार आहेत.

निवडणूक लढवण्यामागील त्यांचा उद्देश जळगाव शहराला राज्याच्या प्रमुख विकास शहरांमध्ये नेणे, बेरोजगारीवर उपाय शोधणे, शिक्षण व आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे, व पायाभूत सुविधांची उभारणी करणे हा आहे.

जळगावच्या राजकीय वर्तुळात माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवणारे नागरिक त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उत्सुक आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने