Top News

पावसाचे पाणी व्यवस्थापनासंबंधी कुंभार खोरी वनविभागाने केली पाहणी

 
पृथ्वी लक्ष्य बहुउद्देशीय संस्थेला प्राप्त झाला अहवाल 

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आपल्या सावखेडे शिवारातील पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासंबंधी कुंभार खोरी वन विभागाने केलेल्या पाहणीचा अहवाल पृथ्वी लक्ष्य बहुउद्देशीय संस्थेला प्राप्त झाला आहे. वन विभागाचे इंजिनिअर आर. डी. पाटील यांनी सावखेडे शिवारात वन विभागातून शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याची तपासणी केली आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार वन विभागात एकूण तीन नाले आहेत, आणि त्या तीनही नाल्यावर प्रत्येकी तीन बांध बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले आहे.

तसेच, कॉलनीच्या सिमेवर मातीचा बांध बांधकाम करून पावसाचे पाणी रहिवासी वस्तीत शिरण्यापासून रोखणे आवश्यक आहे. या सर्व उपाययोजनांसाठी आवश्यक काम लवकरच सुरू केले जाईल.

स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल कोणतीही माहिती किंवा शंका असल्यास कृपया पृथ्वी लक्ष्य बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क साधावा. या उपाययोजनांमुळे परिसरातील जलव्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल आणि पावसामुळे होणाऱ्या समस्यांपासून संरक्षण मिळेल, अशी आम्ही आशा करतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने