Top News

गणेशोत्सव विसर्जन काळात शहरातील वाहतुक मार्गात बदल



विसर्जन दरम्यान इचछादेवी ते पाचोरा रोड पूर्णपणे बंद राहणार, असे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले  


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरात 07 सप्टेंबर  ते  17 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.


    जळगाव ते पाचोऱ्या वरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस टी बसेस, अवजड वाहने करीता इच्छादेवी चौकी - डी मार्ट - मोहाडी रोड Y पॉईंट - गायत्री नगर - गणेश घाट - सेंट टेरीसा स्कुल - हॉटेल ग्राप्पेस - मलंगशहा बाबा दर्गा - शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहने विसर्जन दरम्यान बंद राहील. तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतुक (हलक्या व मध्यम वाहनाकरीता) - इच्छादेवी चौकी - डि मार्ट - मोहाडी रोड Y पॉईंट - गायत्री नगर -  गणेश घाट - सेंट टेरीसा स्कुल - हॉटेल ग्रॅपेस - मलंगशहा बाबा दर्गा - शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या सर्व मध्यम व हलक्या वाहनांकरीता मार्ग बंद राहिल.


  जळगाव कडून पाचोऱ्याकडे  जाणा-या कार व मोटार सायकल करीता आकाशवाणी चौक - काव्यरत्नावली चौक - महाबळ चौक - संत गाडगेबाबा चौक - राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) - मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरा कडे आणि पाचोऱ्याकडून जळगाव कडे येणा-या  कार व मोटार सायकलसाठी मलंगशहा बाबा दर्गा - गुरू पेट्रोलपंप (G मॉल) - राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) - संत गाडगेबाबा चौक - महाबळ चौक - काव्यरत्नावली चौक - आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडे पर्यायी मार्ग असणार आहे.


  आसोदा- भादली कडून जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज -  गजानन मालुसरे नगर - जुने जळगाव - लक्ष्मी नगर - कालंका माता मंदीर मार्गे - महामार्गावरुन अजिंठा चौक - आकाशवाणी चौक - नविन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करु शकतील. पाचोरा कडून येणा-या जड वाहनांन करीता वावडदा – नेरी - अजिंठा चौक मार्गे जळगांव पर्यायी मार्ग असणार आहे असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने