Top News

जळगावात थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत सेंट टेरेसा स्कूल विजयी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगावात थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 

जळगाव, प्रतिनिधी I जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सप्ताहात थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धेत १९ वर्षाआतील मुलांच्या तिसऱ्या क्रमांकावर तर १९ वर्षावरील महिलांच्या गटात उपविजयी सेंट टेरेसा हायस्कुलने बाजी मारली आहे. 
महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, क्रीडा भारती जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, आणि जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 2024 निमित्त राष्ट्रीय दिन क्रीडा सप्ताहातील आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी 19 वर्षा आतील मुले व मुली आणि 19 वर्षावरील पुरुष व महिला थ्री ऑन थ्री बास्केटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. 
सदर स्पर्धेत 19 वर्षा आतिल मुलांच्या गटात 7 संघ, मुलींच्या गटात 5 संघ आणि 19 वर्षा वरील पुरुषांच्या गटात 10 संघ तर महिलांच्या गटात 4 संघ सहभागी होते. १९ वर्षातील मुलांच्या गटात विजयी- राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव, उपविजयी- सेंट जोसेफ हायस्कूल जळगाव आणि तृतीय- सेंट टेरेसा हायस्कूल जळगाव,  १९ वर्षा आतिल मुलींच्या गटात विजयी- किड्स गुरुकुल सावखेड़ा, उपविजयी- सेंट लॉरेंस हायस्कूल जळगाव आणि तृतीय-  सेंट जोसेफ हायस्कूल जळगाव, १९ वर्षा वरील पुरुषांच्या गटात विजयी- पाचोरा बास्केटबॉल ग्रुप पाचोरा, उपविजयी- छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा मंडळ एरंडोल, आणि तृतीय- यूनिटी बास्केटबॉल क्लब पाचोरा, १९ वर्षा वरील महिलांच्या गटात विजयी- एकलव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बास्केटबॉल अकादमी जळगाव, उपविजयी- सेंट टेरेसा हायस्कूल जळगाव आणि तृतीय- सेंट जोसेफ हायस्कूल जळगाव यांनी पटकाविला.
थ्री ऑन थ्री 19 वर्षा आतील मुले व मुलींच्या बक्षिसांसाठी मास्टर माईंड अकॅडमीचे संचालक प्राध्यापक इंजिनियर अभिजीत खाचणे आणि १९ वर्षावरील पुरुष व महिलांच्या स्पर्धेच्या बक्षिसांसाठी श्रीकृष्ण जलपान सेंटरचे प्रोप्रायटर अरुण पाटील, आशिष पाटील यांचे प्रायोजकत्व लाभले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे आणि पंच म्हणून दिनेश पाटील, आशिष पाटील जावेद शेख, वसीम शेख, सचिन पाटील, परवेज शेख यांनी काम पाहिले.
स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, युवा क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रा. हरिश शेळके, मास्टरमाईंड अकॅडमीचे संचालक प्राध्यापक अभिजीत खाचणे, श्रीकृष्ण जलपान सेंटरचे प्रोप्रायटर आशिष पाटील आणि जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने