Top News

पोलीस कर्मचाऱ्याची दादागिरी, वृत्तपत्र एजंटला केली अमानुषपणे मारहाण

महाराष्ट्रातील श्री काथार सेवा संघाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I छत्रपती संभाजीनगरमध्ये दि 19 ऑगस्ट रोजी वृत्तपत्र एजंट ने पार्सल वेळेवर दिले नाही म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्री काथार सेवा संघाने निषेध व्यक्त करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. 


उपरोक्त विषयी सविनय अर्ज सादर करण्यात येतो की, श्री. जितेंद्र माणके, वृत्तपत्र ऐजेंन्ट, यांना दिनांक १९ ऑगस्ट रोजी पोलिस कर्मचारी श्री जीवन शेजवळ यांनी विनाकारण अमानुष मारहाणी केली, माणके यांनी संबांधिताचे पार्सल वेळेवर दिले नाही म्हणून ! जितेंद्र माणके, अंत्यत गरीबी परिस्थितीत असुन वृत्तपत्र एजन्सी चालवून उदर निर्वाह भागवतात. कुटूंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणुन त्यांनी ऑनलाईन पोर्टलच्या डिलीव्हरीचे काम सुरु केले आहे. सदा तो अविष्कार कॉलनी येथे वयोवृध्द आई वडील, वडील बंधु, अविवाहित बहीणासह राहत आहे. सोमवार दि १९ रोजी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान वृतपत्र वाटप केले, थोड्या विश्रांती व घरकामानंतर सकाळी ११.०० वाजता पार्सल वाटपाचे काम सुरु केले. या दरम्यान पोलीस कर्मचारी शेजवळ यांचा भ्रमनध्वनी (मोबाईल) आला. मानके यांनी नम्रपणे संगितले की, मी पार्सल वाटपाची काम सुरु केले असुन, आपले वसाहतीत आल्यानंतर पाहिल्यादा आपले पार्सल देतो, परंतु पाऊस सुरु झाल्यामुळे पार्सल वाटपास विलंब झाला, कारण पार्सलची सुरक्षितता ही महत्वाची होती. माणके यांच्याकडे एकूण ८५ पार्सल डिलीव्हरी करावयाचे होते. दुपारी २.३० वाजता अविष्कार कॉलनीत पोलीस कर्मचारी शेजवळ यांच्याशी संपर्क केला. संबांधितानी कोणतीही विचारपुस न करता थेट फायबरची काठी घेऊन मारण्यास सुरुवात केली. कारण पार्सल इतक्या उशिराने का आले? यांचा राग आला होता. माणके यांचा चेहरा, बोठ, मांडया, ढोके, पाठीकडील खालचा भाग, म्हणजे या कोणताही मागचा पुठ्चा विचार न करता अमानुष मारहाण केली. त्यामुळे श्री. मानके गंभीर जखमी झाले असुन आता त्यांना काही तासाच्या अंतराने चक्कर आल्यासारखे होते/वाटते. सोबत मारहाणीचे फोटो सोबत जोडले आहे.

महाराष्ट्रातील तमाम काथारवाणी / काथार कंठहार वाणी समाजातर्फे जाहिर निषेध मेहरबान साहेबांना महाराष्ट्रातील काथार वाणी / काथार करण्यात येत आहे.

कंठहार समाजातर्फे विनंती करण्यात येते की. पोलीस कर्मचारी शेजवळ यांची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कामा निलंबन करण्यात यावे. तसेच संबंधित जखमी श्री. जितेंद्र मानके यांना विनाकारण केलेल्या अमानुष मारहाणीची, मानासिक तणावाची रुपये १५ लाख नुकसान भारपाई गृहखात्यामार्फत विनाविंलब देण्यात यावी. तसेच माणके यांच्या कुंटुंबावर प्रचंड मानसिक तणाव व दवाव आहे, कारण संबांधित कडून तक्रार मागे घेण्याबाबत दबाव येत आहे. तरी त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, भविष्यात माणके व त्यांच्या कुंटूंबियांना काही दगाफटका झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी गृहखात्यावर राहिल. महाराष्ट्रातील खालील काथारवाणी / काथार कंठहार वाणी समाजाच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने