Top News

बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला, एमआयडीसी पोलीस स्थानकातील पोलिसांची कामगिरी

जळगाव, निखिल वाणी I जळगाव पासून थोड्याच अंतरावर असलेले कुसुंबा येथील बंद घराला चोरट्यांनी डल्ला मारणाऱ्या चोरट्याला जळगाव शहर एमआयडीसी पोलीस तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी  अटक केली आहे.

दिनांक 02/07/2024 रोजी सकाळी 06.00 वा. ते दिनांक 06/07/2024 रोजी रात्री 11.30 वा.चे दरम्यान फिर्यादी हे त्यांचे सदगुरु बैठक हॉल जवळ, कुसुंबा ता.जि. जळगाव येथील राहते घराला कुलुप लावुन सह परीवार देवदर्शनासाठी उज्जैन येथे गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराला लावलेला कडी कोंडा तोडुन घरात अनाधिकारे प्रवेश करुन घरातील वरच्या माळयावरील बेडरुम मधील कपाटातुन 2,68,600/- रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम 15,000/- रूपये चोरुन नेले म्हणुन सौभाग्य चित्तरंजन सेनापती, वय 28 वर्षे, व्यवसाय फोटोग्राफर, रा. सदगुरु नगर, बैठक हॉल जवळ, कुसुंबा ता.जि. जळगाव यांनी दिले फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी फिर्यादीचे घरात कपाटातील पर्समध्ये 33,100/- रूचा मुददेमाल हा फिर्यादीची पत्नी हिस मिळुन आला आहे. सदर मुददेमालातील एकुण 2,34,900/- रू चा मुददेमाल चोरीस गेल्याचे तपास निष्पनन् झाले.

गुन्हा दाखल झाल्यानतंर गुन्हयांचा तपासा चालु असतांना मा पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम सो यांना मिळाल्या गुप्त माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन आरोपी अविनाश बन्सीलाल पाटील यास ताब्यात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करून त्यांचेकडून सदर घर फोडीत चोरलेला एकुण 2,34,900/- रू किमंती पैकी 2,19,900/- रू मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत सो, निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक / दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ/ किरण पाटील, पोना / किशोर • पाटील, विकास सातदिवे, पोका/ गणेश ठाकरे, पोकॉ/ सिद्धेश्वर डापकर, पोकॉ/ चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे अश्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने