जळगाव, प्रतिनिधि I जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील अपघात प्रकरणातील जखमी योगेश रेंभोटकर यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या १८ रोजी दुपारी १ वाजता नेरी नाका याठिकाणी होणार आहे.
येथील निवृत्तीनगरातील रहिवासी तथा दै.देशदूतच्या जाहीरात विभागातील सहकारी योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय 53) यांचा दि. 14 रोजी अपघात झाला होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दि. 17 रोजी सायकांळी 6.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंतयात्रा गुरूवार दि. 18 रोजी दुपारी 1 वाजता राहत्या घरून नेरीनाका वैकुंठधामात निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, वहिनी, दोन बहिणी असा परिवार आहे. ते जैन इरीगेशनमधील प्रवीण रेंभोटकर यांचे बंधू होत.
टिप्पणी पोस्ट करा