मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण, मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती
जळगाव अपडेट न्युज, निखिल वाणी I गुरू पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आज अनुष्का सेवाभावी संस्थेच्यावतीने गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण, रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आज दि. २१ जुलै रोजी सकाळी ११ गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष अण्णा महाराज, नानाभाऊ बोरसे , डॉ.राहुल चौधरी, डॉ. दिलीप ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता, कवी बी एस व्हडगर, संस्थेचे सचिव वैशाली, योगेश सुतार, प्रवीण पाटील, तुषार वाघुळदे, प्रकाश पाटील, व अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वड, पिंपळ, चिंच, बेल आदी वृक्षाच्या रूपांची लागवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्यावतीने ठीक ३.३० वाजता पळसोद येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चित्रकार योगेश सुतार, तुषार वाघुळदे, कवी बी एस व्हडगर , हिम्मत बाविस्कर व इतर मान्यवर वृक्षारोपणाच्या वेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा