Top News

भारतीय कामगार संघटनेचे विविध मागण्यांसंदर्भात आयुक्तांना निवेदन


*जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I* भारतीय कामगार संघटना कर्मचारीच्यावतीने आज महानगरपालिका आयुक्तांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सपकाळे, रवी बाविस्कर, दीपक भालेराव, दिलीप तायडे, अमोल भालेराव, गोपाळ मोरे, गोकुळ लोंढे, अलका सपकाळे,  रेखा अहिरे, कस्तुरा बाविस्कर, बेबाबाई गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. 

१) महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याचशा महानगरपालिका व नगरपरिषदेने १ ते ४ टप्पे ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाचे टप्पे दिले आहेत. तसेच जळगाव महानगरपालिकेने सुद्धा १ ते ४ टप्पे न करता सर्व टप्पे एकत्रित करून द्यावे.

२) सी.आर. फार्म कालबद्धते करीता अस्थापना विभागाने पूर्तता करावी, कारण बहुतांश अधिकारी हे बदलून गेले व काही मयत झाले आहे तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. त्या करीता सदर फार्म भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना फिरावे लागते. तसे पाहिले तर कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अस्थापना विभागातच असते.

३) सफाई कामगारांना किरकोळ रजे करीता आरोग्य अधिकारी व C.S.I. व उपायुक्त (आरोग्य) यांच्या सह्या घ्याव्या लागतात. एक दिवसाच्या किरकोळ रजे करीता कर्मचाऱ्याला इतकी फिरफिर करावी लागते. 

४) सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे १ ते ५ तारखेच्या आत व्हावे. कारण कर्मचाऱ्यांनी बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्जाने घर, टी.व्ही., फ्रिज, मोटर सायकल व इतर घरगुती वस्तू कर्जाऊ रकमेने घेतले असते. त्याचे हप्ते बँकेच्या नियमानुसार १ ते ५ तारखेच्या आत असतात. ते न भरल्यास कर्मचाऱ्यांना नाहक बँकेचा आर्थिक दंड व भुर्दंड भरावा लागते.

५) लाड-पागे समितीच्या निर्णयानुसार जे रिटायर होत आहे. त्यांच्या वारसांना G.R. नुसार ३० दिवसाच्या आत सेवेत समावेश करून घ्यावे.

६) आरोग्य कर्मचाऱ्यांना पावसाळी साहित्य मिळावे. (जसे गमबूट, ग्लोझ, मास्क, रेनकोट, छत्री इत्यादी).

तरी मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा लवकरात लवकर सहानुभूतीपूर्वक विचार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी आज निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने