मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे उद्घाटन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I अनुष्का सेवाभावी संस्था जळगांवच्यावतीने दि.२१ रविवार रोजी सकाळी ११ वाजता श्री संत गजानन महाराज मंदीर परीसर बांभोरी, धरणगाव, जि. जळगांव येथे वृक्षरोपण व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून. डॉ एस. एन. पाटील, केद्रीय पर्यावरण व जल वायु मंत्रालय समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य, डॉ दिलीप ढेकळे, डीन गोदावरी मेडीकल कॉलेज, जळगाव, नानाभाऊ बोरसे, निवृत अभियंता, रमेश पाटील कक्षाधिकारी उ.म.वि., डॉ. राहुल चौधरी, गोळवलकर रक्तपेढी, जळगाव, रवी फालक, उद्योगपती, जळगाव. ह.भ.प. आण्णा महाराज, गजानन महाराज संस्थान बांभोरी, कवी बी.एस. व्हडगर, सुधाजी काबरा, समाज सेविका, दिपक गुप्ता, समाजसेवक यांची उपस्थीती लाभणार आहे.
वृक्षरोपनात प्रामुख्याने वड, पिंपळ, कडूनिंब यांची लागवड करण्यात येइल. या वेळी महाप्रसादाचे आयोजन करणयत आले आहे, अशी माहिती संस्थाचे समन्वयक श्री. प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. सर्व नागरीक वृक्षप्रेमींनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहान करण्यात आले आहे. संस्थेने त्याच दिवशी दि.२१ रोजी दु. ३.३० वाजता श्री क्षेत्र रामेश्वर संस्थान, पळसोद ता.जळगाव येथे देखील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
त्यावेळी महंत नारायण स्वामी, लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा व रमाकांत पाटील, कवी बिरुदेव व्हडगर, चित्रकार योगेश सुतार, या मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण होणार आहे. वृक्षरोपनात प्रामुख्याने वड, पिंपळ, कडूनिंब यांची लागवड करण्यात येईल असे संस्थेचे समन्वयक प्रकाश पाटील यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा