जळगाव - श्री श्री १००८ दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान, सांगवी, ता. पारोळा, जि.जळगांव ते दादाजी दरबार खंडवा पायी दिंडी यात्रा चा पहिल्या जळगांव येथील मुक्काम निम्मीत्याने सर्व दिंडी करु आणि भाविकांसाठी आरोग्य सुविधा (मेडीकल कॅम्प) एस.डी.फाऊंडेशन तर्फे आयोजित केला गेला.
सेवाधर्म परिवाराचे प्रमुख चंद्रशेखर नेवे यांच्या उपस्थितीत आरोग्य सेवेला सुरवात केली गेली. आरोग्य सेवेला जळगांव शहराचे आमदार राजु मामा भोळे, ज.श.म.न.पा.चे नगरसेवक मयुर कापसे यांनी भेट दिली.
पद्मालय सर्जिकल चे सुभाष वाणी यांनी आरोग्य सेवे ला लागणारे सर्व सर्जिकल वस्तु मोफत देऊन एस.डी.फाऊंडेशनला मदत केली. डॉ. श्री देवानंद धुमाळ, डॉ.सौ.स्वाती धुमाळ तसेच प्रशिक्षणार्थी डॉ.चेतन दुसाने, डॉ.नुपुर चौधरी, डॉ.महेक तलरेजा, डॉ.मानसी पाटील यांनी आरोग्य तपासणी आणी औषधोपचार केले. २७० हुन अधीक भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. एस.डी.फाऊंडेशन तर्फे सर्व डॉक्टर आणी प्रमुख पाहुण्यांचे तुळशी रोप देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव सुहास दुसाने यांनी सांगितले की, अश्या प्रकारची सेवा आम्ही निरंतर करीत राहू. प्रसंगी अनेक मान्यवर, परिसरातील नागरिक, फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकेश जाधव व एस डी. फाऊंडेशन चे पदाधिकारी सुधाकर मगन दूसाने- अध्यक्ष, छोटू सीताराम पाटील - उपाध्यक्ष, श्री. तेजस मधुकर सोनवणे - सह सचिव, सौ. भाग्यश्री सुहास दुसाने - खजिनदार, सौ. जयश्री पंकज बऱ्हाटे - सदस्य, सौ. रोहिणी अजित विसपुते - सदस्य, श्री. प्रशांत विसपुते – प्रसिद्धी प्रमुख आदींनी खूप मेहनत घेवुन कार्यक्रम पार पडला असे श्री. सुहास सुधाकर दुसाने - सचिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा