Top News

जळगाव जिल्हा बास्केटबॉल संघासाठी निवड चाचणी; २६ मार्चला दीपनगर येथे संधी

१८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ट्रायल्स; ७६वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा नाशिकमध्ये

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने १८ वर्षांखालील मुला आणि मुलींसाठी ७६ वी युवा आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवडण्यासाठी खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

ही निवड चाचणी गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दीपनगर येथील बास्केटबॉल मैदानावर पार पडणार आहे. या चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००८ नंतर झालेला असणे आवश्यक आहे. तसेच मुलींच्या गटासाठी १५ वर्षे पूर्ण असलेल्या खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार आहे.

निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्डची प्रत तसेच जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडून मिळालेले जन्म प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.

जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव नीलेश पाटील आणि जितेंद्र शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने