Top News

जळगाव महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई

अवैध दारूविक्रीविरोधात धाडी; ३ गुन्हे दाखल, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविक्री व साठ्यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असून, आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्री. डॉ. व्ही. टी. भुक्न यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली.

निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांनी अवैध दारूधंद्यावर धाडी टाकून एकूण ३ गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत निरीक्षक डी. एम. चकोर, निरीक्षक के. डी. वराडे तसेच त्यांचा स्टाफ — एस. एम. मोरे (सहाय्यक दुय्यम निरीक्षक), जवान आर. डी. जंजाळे, पी. पी. लायडे, जी. डी. आहिरे, अमोल पाटील व धनसिंग पावरा यांनी सहभाग घेतला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक कालावधीत आतापर्यंत एकूण ३२ गुन्हे नोंदविले असून, त्यामध्ये गावठी हातभट्टी दारू : १५१५ लिटर, देशी दारू : २३ व्ही. एल., बिअर : ७, ताडी : ८७ लिटर, कच्चे रसायन : २२१० असा एकूण ₹२,२३,१७५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासोबतच, अवैध ढाब्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, शहरात रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेला बाधा येऊ नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणूक संपेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर मोहिमेत निरीक्षक डी. अशोक लाप, निरीक्षक, वाय. वाय. सूर्यवंशी व त्यांच्या स्टाफनेही सक्रिय सहभाग घेतला आहे. अवैध दारूविक्रीमुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाकडून पुढील काळात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने