Top News

संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथे गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संत गाडगे महाराज शिक्षण संस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथे जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील, संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचालक प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी संत गाडगेबाबा च्या फोटोला पुष्पहार अर्पण पूजन करण्यात आले. 

तसेच सर्व लाभार्थ्यांसमवेत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन म्हणत स्वच्छता रॅली काढण्यात आली. निवारा केंद्रात स्वच्छता व परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटल चे मानसोपचार विभागाचे डॉक्टर अनंत साळुंखे व ज्योती पाटील यांनी लाभार्थ्यांची तपासणी करून औषधोपचार शिबिर घेण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना फोडणीचे वरण भात फुलकोबीची भाजी पोळी गोड शिरा असे जेवण देण्यात आले. त्यावेळी संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी काळजी वाहक राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, शितल काटे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने