Top News

जळगावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महाबळ परिसरासह अनेक भागांत घाणीचे साम्राज्य

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील महाबळ परिसरासह काव्यरत्नवली चौक, हतनूर कॉलनी, छत्रपती संभाजी नगर रोड, समता नगर, त्र्यंबक नगर, शकुंतला राणे विद्यालय परिसर ते संत गाडगे बाबा चौकापर्यंत रस्त्यांवर प्रचंड कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून या ठिकाणी नियमित साफसफाई होत नाही. कचरा, प्लास्टिक, सडलेले अन्न व इतर वस्तूंचा ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईडसारख्या आजारांचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.

या संदर्भात नागरिकांनी सोशल मीडियावर छायाचित्रे व व्हिडीओ शेअर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक रहिवासी प्रशासनाकडे तातडीने घाणीचे साम्राज्य दूर करून परिसरात स्वच्छतेची उपाययोजना करण्याची मागणी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने