“नमो उद्यान” उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १ कोटी मंजूर
चाळीसगाव, निखिल वाणी - महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण" योजनेअंतर्गत, चाळीसगाव नगरपरिषद अंतर्गत १ कोटी असा भरीव मंजूर केला आहे. या निधीतून चाळीसगाव शहरामध्ये भव्य “नमो उद्यान” उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल दि.१७ सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने हा शासन निर्णय प्रकाशित केला असून ही मोदिजींच्या वाढदिवसाची चाळीसगाव शहरवासियांना विकासात्मक भेट असल्याची माहिती चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
“नमो उद्यान” या महत्त्वापूर्ण प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन व महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
यापूर्वी चाळीसगाव शहरात छोट्या – मोठ्या २५ हून अधिक खुल्या जागांवर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी उद्याने उभारण्यात आली आहेत तसेच चाळीसगाव शहरातील सर्वात मोठ्या सुवर्णा स्मृती उद्यानाचे नूतनीकरण काम देखील युद्धपातळीवर सुरु आहे. त्यात अजून एका उद्यानाची भर पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या नमो उद्यानामुळे चाळीसगाव शहरातील :
- नागरिकांना आधुनिक, हिरवाईने नटलेले आणि सुसज्ज उद्यानाची सुविधा मिळणार आहे.
* मुलांसाठी खेळाची साधने, नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य, वॉकिंग ट्रॅक व विश्रांतीची सोय उपलब्ध होणार आहे.
* पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळून, शहरातील जीवनमान अधिक आरोग्यदायी व समृद्ध होणार आहे.
* शहर सौंदर्यीकरणाबरोबरच सामाजिक एकात्मता व नागरीकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा