Top News

राकाँशप पक्षाच्या जळगाव युवक तालुकाध्यक्षपदी महेश वासुदेव बोरसे-पाटील यांची नियुक्ती

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील शिरसोली गावचे रहिवासी महेश वासुदेव बोरसे-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उद्योजक एकनाथ पाटील यांच्या सर्वज्ञ इन्फ्रास्ट्रक्चर, धरणगाव येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

यावेळी धरणगाव युवक तालुकाध्यक्षपदी परेश गुजर (जांभोरे), युवक कार्याध्यक्षपदी साईनाथ पाटील (बाभुळगाव), युवक तालुका उपाध्यक्षपदी राहुल पाटील (बाभुळगाव), योगेश पाटील (सार्वे), प्रमोद पाटील (पिंपळे बु) यांचीही निवड करण्यात आली.

या बैठकीस युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, माजी युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, महिला तालुकाध्यक्ष आशा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रा. एन.डी. पाटील, डॉ. विलास चव्हाण, जेष्ठ पदाधिकारी नंदू धनगर, राजेंद्र धनगर, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत बोलताना मान्यवरांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करताना शरदचंद्र पवार साहेबांचा पुरोगामी विचार जनमानसात रुजवणे आणि बूथ कार्यकर्त्यांना सक्षम करणे यावर भर दिला.

कार्यक्रमाला जेष्ठ नेते विनायक पाटील, रमेश सपकाळे, भगवान शिंदे, अमित शिंदे, गोपाल पाटील, युवा कार्यकर्ते जुनेद बागवान, साजिद कुरेशी, प्रकाश लांबोळे आदींचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने