जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील पिंप्राळा परिसरातील पि. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालयाच्या १९९४-९५ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३० वर्षांनंतर जुन्या मित्रमैत्रिणींची भेट घडून आली आणि जुन्या आठवणींनी सर्वांचे मन भरून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जुन्या विद्यार्थ्यांनी - भरत कोळी, प्रकाश बारी, अँड. संतोष संगोळकर, रविंद्र माळी, रमेश निमजे, दिलीप कोळी, गोपाळ कोळी व जितेंद्र चव्हाण यांनी केले. तर या आयोजनात वर्गमित्र-मैत्रिणी संगीता महानुभाव, शुभांगी कुलकर्णी, निता बारी, जया सोनार, ज्योती सोनार, निता भोकरे, वंदना म्हस्के, प्रतिभा बेलदार, अर्चना भोपाळे, शैला माळी, सुधाकर सपकाळे, जितेंद्र सुलताने, पांडुरंग पाटील, पंडित महाले, राजेश येदे, अविनाश सोनार, काशिनाथ सोनार, जगदीश पाटील, प्रदीप कापुरे, डॉ. सुरेश सैनी, विनोद सूर्यवंशी, शरद पाटील, राजू चौधरी, विजय बारी, सुभाष धनगर, मिनल थोरात, प्रकाश पाटील, चंद्रकांत बुंदेले, प्रवीण महाले, शेखर कापसे, सुभाष बारी, जयंत सपकाळे, नाना कोळी, गणेश नाथजोगी आदींनी मोलाची मदत केली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता झाली. यावेळी शिक्षकवृंदांचा सत्कार करण्यात आला. उंबरकर सर, ई. वी. पाटील, राजोळे सर, एफ. जी. पाटील, एन. एम. पाटील, काटे मॅडम, बी. झेड. पाटील व कुलकर्णी भाऊसाहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाला शुभारंभ झाला. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून जुने विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त केला.
यानंतर सर्व जुन्या मित्रमैत्रिणींनी आठवणींना उजाळा दिला. सकाळी नाष्टा, दुपारी भोजन आणि त्यानंतर मनोरंजनात्मक नृत्य-कला कार्यक्रमाने सर्व उपस्थितांना जुन्या शालेय दिवसांची आठवण करून दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना भेटून पुन्हा अशाच गेट-टुगेदरचे आयोजन करण्याचा संकल्प केला. "वंदे मातरम्"च्या घोषणेनंतर सोहळ्याची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बारी यांनी केले, तर आभारप्रदर्शन किरण पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा