जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
घरापासून दूर राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात आज रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात साजरा झाला. रेड स्वस्तिक सोसायटी महिला विंग, जळगाव तर्फे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात सणाची उणीव भासू नये, यासाठी भावनिक वातावरणात राख्या बांधण्यात आल्या.
रेड स्वस्तिक जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या हातावर राख्या बांधत रक्षाबंधनाचे महत्त्वही यावेळी विशद करण्यात आले. या वेळी मनीषा पाटील, नीता विसावे, वंदना मंडावरे, ज्योती राणे, नूतन तासखेडकर, रेणुका हिंगु, किमया पाटील, शिल्पा बयास, हर्षाली तिवारी व स्मिता पाटील उपस्थित होत्या.
राखी बांधणाऱ्या स्वयंसेविकांमध्ये माही बयास, आर्या सरताळे, नेहा मौर्य, तेजल वनरा व स्तुती मकवाना यांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर वसतिगृह अधीक्षक माजी सुभेदार समाधान धनगर यांनी रेड स्वस्तिक सोसायटीचे आभार मानले. या वेळी पहारेकरी शिवाजी पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा