जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या जुगाराच्या सत्रावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने *हॉटेल रॉयल पॅलेस* येथे धाड टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपये रोख, १३ मोबाईल फोनसह आठ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
१० जुलैच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर येथील सागरपार्क मैदानाजवळील रूम क्रमांक २०९ मध्ये काही व्यक्ती तीन पत्ती (झन्ना मन्ना) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोउनि शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, संदीप चव्हाण, पो.ना. किशोर पाटील आणि पो.कॉ. रविंद्र कापडणे यांच्या पथकाने कारवाईची योजना आखली.
११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ दरम्यान पथकाने हॉटेलवर छापा टाकला. चौकशीअंती सदर खोली *मदन लुल्ला* यांच्या नावावर बुक असल्याचे निष्पन्न झाले. तपासणी दरम्यान ८ जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1. पप्पु सोहम जैन (वय ३२, रा. बळीराम पेठ)
2. भावेश पंजोमल मंधान (वय ३७, रा. सिंधी कॉलनी)
3. मदन सुंदरदास लुल्ला (वय ४२, रा. गणपती नगर)
4. सुनील करलाल वालेचा (वय ४०, रा. सिंधी कॉलनी)
5. अमित राजकुमार वालेचा (वय ४५, रा. गणेश नगर)
6. विशाल दयानंद नाथानी (वय ४८, रा. गायत्री नगर)
7. कमलेश कैलाशजी सोनी (वय ३६, रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड)
8. रुखील (वय ३२, रा. जळगाव)
या आठ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून *रामानंदनगर पोलीस ठाण्यात* गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धडक कारवाईमुळे जळगावमधील जुगारी वर्तुळात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
टिप्पणी पोस्ट करा