Top News

जिल्हा क्रीडा संकुलातील खेळाडू काजल भाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण व रौप्यपदकांची चमकदार कामगिरी

जिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे शिपाई पदावर थेट नियुक्त झालेल्या पावर लिफ्टिंग खेळाडू काजल भाकरे यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी सिध्द करत नुकत्याच कर्नाटक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले आहे.

काजल भाकरे यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे नियमित सराव करून ही कामगिरी गाठली असून त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा राज्यासह जिल्ह्यालाही अभिमान वाटावा अशी ही कामगिरी ठरली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः पुढाकार घेत सत्कार करून अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोमल भाकरे यांना क्रीडा विभागाने त्यांना शासकीय नोकरीत समावून घेतले आहे.

या यशामागे जिल्हा क्रीडा विभागाचा आणि प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा असून, कोमल भाकरे यांचे राष्ट्रीय स्तरावरचे यश हे इतर क्रीडापटूंना प्रेरणा देणारे ठरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने