अनिता कापुरे यांची शाखाध्यक्ष, तर लक्ष्मी भिल यांची उपशाखाध्यक्षपदी निवड; ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखेचे नवे कार्यालय माजी आमदार आणि मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अनिता कापुरे यांची महिला शाखेच्या शाखाध्यक्षपदी, तर लक्ष्मी भिल यांची उपशाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यात बोलताना ॲड. बाविस्कर यांनी महिला सेनेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. "नवीन कार्यालय परिसरातील नागरिकांसाठी न्याय मिळवण्याचे केंद्रबिंदू ठरेल व मनसेच्या जनहितकारी कार्यास बळकटी देईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले यांनीही आपली उपस्थिती नोंदवली. त्यांनी मनसेची कार्यपद्धती, धोरणे आणि सामाजिक बांधिलकी यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, लताबाई पाथरकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाकभाई सय्यद, ॲड. सागर शिंपी, साजन पाटील, सतीश सैंदाणे, संदीप मांडोळे, दीपक राठोड, पंकज चौधरी, ऐश्वर्या श्रीरामे, अनिल दिघे, अविनाश जोशी, राहुल चव्हाण, तसेच तालुकाध्यक्ष अशोक पाटील (जामनेर), विशाल सोनार (एरंडोल), प्रदीप पाटील (शेतकरी सेना), आशुतोष जाधव, रोहिदास मिस्तरी, खुशाल ठाकूर, निलेश खैरनार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले होते. सूत्रसंचालन ललित शर्मा आणि श्रीकृष्ण वेगळे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद शिंदे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा