Top News

लग्नाच्या दोन महिन्यांपूर्वीच २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; मेहरूण परिसरातील घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील मेहरूण परिसरात एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव नवाज़ सादिक सैय्यद (वय २६, रा. महादेव मंदिराजवळ, मेहरूण, जळगाव) असे असून तो हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. नवाज़ आपल्या आई-वडिलांसह कुटुंबासोबत राहत होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आगामी दोन महिन्यांत त्याचे लग्न ठरले होते.

बुधवारी (दि. ९) पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्याच्या वडिलांनी झोपेतून उठवण्यासाठी हाक मारली, तेव्हा त्याने घरातच गळफास घेतल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, नवाज़ने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून एमआयडीसी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने