Top News

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची ८० हजार रुपयात फसवणूक



पोलिस असल्याची बतावणी केली फसवणूक, एमआयडीसी पोलिस स्थानकात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर मंगळवारी सकाळी ११ वाजता एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पोलिस असल्याची बतावणी करून दोन अज्ञात युवकांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव रामचंद्र चटरूमल पारप्यानी (वय ६२, रा. सिंधी कॉलनी) आहे. ते सेवानिवृत्त कर्मचारी असून मंगळवारी सकाळी १० वाजता रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मोटारसायकलवर जात होते. त्यावेळी ३० ते ४० वयाच्या दोन अज्ञात युवकांनी त्यांना थांबवले आणि पोलिस असल्याची बतावणी केली. दोन्ही युवकांनी पारप्यानी यांना सांगितले की, पुढील रस्त्यावर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.

याप्रमाणे विश्वास दिल्यानंतर, पारप्यानी यांनी त्यांच्याकडील २० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट आणि ३० हजार रुपये रोख रक्कम, असे एकूण ८० हजार रुपयांचे ऐवज, दोन्ही युवकांना दिले. युवकांनी हा ऐवज गाडीच्या डिकीत ठेवण्याचे सांगितले, परंतु गाडीच्या डिकीत ऐवज ठेवण्याच्या भासवून त्यांनी सर्व सामग्री घेऊन ते निघून गेले.

फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उगले तपास करत आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने