Top News

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त पार्किंगवर कारवाई**

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी : जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मंगळवारी झालेल्या या कारवाईमध्ये शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी २० जणांवर दंडात्मक कारवाई केली. 

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना कार्यालय परिसरात रस्त्यांवर तसेच वाहनतळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वाहने उभी असल्याचे दिसून आले. त्यात काही वाहने कर्मचाऱ्यांची होती. कार्यालयातील वाहतूक व्यवस्थेची स्थिती गंभीर होत चालली होती, त्यावर त्यांनी त्वरित लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचार्यांना बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंड लावण्यात आले. अनेक वाहनधारकांनी जागेवरच दंड भरून पावती घेतली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगवरील शिस्तीची समस्या गंभीर होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. आयुष प्रसाद यांचा हा निर्णय कार्यालय परिसरात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे लक्षात घेता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भविष्यात बेशिस्त पार्किंगची समस्या टाळण्यासाठी प्रशासन अधिक कडक उपाययोजना करू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने