Top News

शिवसेनेने संघटन बळकटीकरणासाठी घेतला महत्त्वाचा पाऊल; गुलाबराव पाटील यांची नवीन नियुक्ती

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची परभणी, बुलढाणा जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती, पक्षाच्या कार्यकुशलतेला नववळण

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शिवसेनेने संघटन बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, आपल्या वरिष्ठ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवली आहेत. यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गुलाबराव पाटील यांचा या जिल्ह्यांमध्ये अनुभव अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी यापूर्वी प्रशासकीय तसेच संघटनात्मक कामकाज पाहिले असून, त्यांची कार्यक्षमता आणि नेतृत्व क्षमता शिवसेनेला विश्वास देत आहे. त्यांच्यावर दाखवलेला विश्वास लक्षात घेत, शिवसेना पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नवीन जबाबदारीची नियुक्ती केली आहे.

गुलाबराव पाटील यांना याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाले, “शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी पूर्णतः न्याय देईन आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. माझ्या कर्तृत्वातून पक्षाच्या कार्याला नवा दिशा देण्याचा माझा प्रयत्न असेल.”

गुलाबराव पाटील यांच्या नवीन जबाबदाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रगतीला वेग मिळेल, तसेच परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये देखील शिवसेनेची उपस्थिती आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.

शिवसेनेच्या या निर्णयावर पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील आनंदी आहेत, आणि पुढील काळात गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिक कार्यक्षमतेने संघटन बळकटीकरणाची प्रक्रिया सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने