Top News

पारोळा पोलिसांनी मोटार चोरी प्रकरणी दोन आरोपींना केली अटक


त्यांच्याकडून ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शेतकऱ्याच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सखोल तपास करून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दिनांक ०४ मार्च रोजी फिर्यादीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पारोळा पोलीसांनी तात्काळ तपास सुरू केला.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांनी चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पारोळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला.

तपासाच्या दृष्टीने पोउपनि अमरसिंग डी. वसावे, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील, पोकों विजय पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारावर संशयित आरोपी योगेश उर्फ सुर्या रमेश पाटील (रा. शेवगे बु., ता. पारोळा, जि. जळगाव) आणि योगेश उर्फ खगेश शालीक मगर (रा. साकुर, ता. मालेगाव, जि. नाशिक, ह.मु. पारोळा) यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस नाईक संदिप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी एकूण ५२ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहेत. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल पारोळा पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले आहे, तसेच चोरीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पुढील काळात अशा घटनांवर कडक कारवाई सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने