Top News

सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्यावर एमआयडीसी पोलिसांची कारवाई


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील तांबापूरा परिसरात गांजा सारख्या अंमली पदार्थाचे सेवन करत असलेल्या संशयितावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. हा प्रकार २ मार्च रोजी दुपारच्या सुमारास जुम्मा शहा वखारीजवळ घडला. 

संशयित गोकुळ भरत बाटुंगे (वय ४२, रा. तांबापुरा) हा सार्वजनिक ठिकाणी चिलीमद्वारे गांजा सारखा गुंगीकारक पदार्थ सेवन करताना आढळला. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून सहाशे रुपयांचा गांजा आणि चिलीम जप्त केली. 

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर व विक्री रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई सतत सुरू आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने