Top News

कजगाव येथील विहिरीत आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह


अंगठ्यावर 'पी' गोंदलेला, पोलीस ओळख पटविण्याच्या प्रयत्नात

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
कजगाव भडगाव मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या कजगाव शिवारातील वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर, कजगाव चे पोलीस पाटील राहुल पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली, ज्यामुळे पोलीस स्टेशनचे पीएसआय सुशील सोनवणे यांच्यासह कजगाव बीटचे पोलीस नाईक नरेंद्र विसपुते व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

मृत तरुणीचे वय साधारणपणे २५ वर्षे असल्याचे अंदाज आहे. मृत्यूच्या तपासात, या तरुणीच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मागील बाजूस इंग्रजीत 'पी' गोंदलेला दिसून आला. भडगाव पोलीस स्टेशनने या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, या तरुणीची ओळख पटविण्याचे कार्य पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

या घटनेबाबत अधिक तपास सुरु आहे आणि पोलीस या तरुणीच्या ओळखीच्या प्रक्रियेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने