Top News

३५ वर्षीय मजूर युवकाचा विजेच्या खांब्यावर धडकून मृत्यू


जामनेर तालुक्यात पळसखेडा मीराचे गावाजवळ घटना, गावात पसरली शोककळा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जामनेर तालुक्यातील पळासखेडा मीराचे गावाजवळ शनिवारी, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडलेल्या भीषण अपघातात एक मजूर तरुण मयत झाला. या अपघातात संतोष गोविंदा टाकरे (वय ३५, रा. पाळधी ता. जामनेर) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनुसार, संतोष टाकरे हे पळासखेडा गावाकडे कामासाठी गेले होते. काम पूर्ण करून ते घरी परतत असताना त्यांची दुचाकी (एमएच १९ – ३५५०) विजेच्या खांबावर धडकली. या धडकेत संतोष गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारांदरम्यान, मंगळवारी, २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

संतोष टाकरे हे पाळधी गावातील एक सामान्य मिस्त्री होते. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि ५ मुलांचा समावेश आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते मेहनतीचे काम करत होते. संतोषच्या मृत्यूसमोर कुटुंबीयांनी आक्रोश केला असून पाळधी गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. संतोषच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे येण्याची अपेक्षा आहे. या अपघातामुळे संतोष टाकरे यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने