Top News

शासकीय मालमत्तेची मोठी चोरी; दोन इलेक्ट्रिक पोल व ३६० मीटर तार लंपास

नंदगावात शेतकऱ्याच्या शेतातून जबरी चोरी; जळगाव तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील नंदगाव येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव सुका चांभार यांच्या शेतात ११ जानेवारी रोजी रात्री शासकीय मालमत्तेची मोठी चोरी झाली आहे. त्याच्या शेतामध्ये असलेल्या गट नंबर १३५/२ आणि १४० या शेतामध्ये दोन इलेक्ट्रिक पोल व ३६० मीटर लांबीच्या ॲल्युमिनियम विद्युत वाहक तारांची जबरी चोरी केली गेली आहे.

या चोरीची घटना शेतकऱ्याच्या मुलाला लक्षात आल्यावर संबंधित गावातील वीज कर्मचारी चंद्रकिरण सोनवणे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता ललित नारखेडे यांना कळवण्यात आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास केला आणि चोरीची माहिती जळगांव तालुका पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तथापि, यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती झाली होती, परंतु त्यावेळी संबंधित शेतकऱ्याने म.रा.वि.मंडळाच्या कर्मचाऱ्यांना तक्रार केली असताना, पोलिस प्रशासनाकडे कोणताही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. या वेळेस मात्र चोरीच्या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आली आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ गुन्हा नोंदवला.

सदरील चोरीचा तपास जळगांव तालुका पोलिस ठाण्याचे हे.कॉ. डी.डी. चौधरी करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने