जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान, जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी, पक्षाचा विस्तार करण्यासंदर्भात अजितदादांनी सूचना व मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित राहिलेले प्रमुख पदाधिकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, तसेच प्रदेश सरचिटणीस रविभाऊ पाटील यावेळी उपस्थित होते.
अजितदादांच्या मार्गदर्शनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आणखी वाढविण्याचे ठरवले गेले.
टिप्पणी पोस्ट करा