Top News

जळगावमध्ये ४० वर्षीय तरुणाची विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय कमल विक्रम डोंगरे यांनी शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी आहे की, मयत कमल डोंगरे हे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने