Top News

धनादेश चोरून रासायनिक प्रक्रियेद्वारे नाव बदलून २ लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार

चेक ड्रॉप बॉक्समधून धनादेश चोरून इतर बँक खात्यांमध्ये जमा; बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे घडला उलगडा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एका खासगी बँकेतील चेक ड्रॉप बॉक्समधून धनादेश चोरून, त्यावर रासायनिक प्रक्रियेद्वारे नाव बदलून, त्या धनादेशांद्वारे इतर बँक खात्यांमध्ये २ लाख ५८ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, विसनजी नगरातील बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकांसाठी धनादेश पेटी (चेक ड्रॉप बॉक्स) सुविधा उपलब्ध आहे. बँक अधिकारी दररोज तीन वेळा या पेटीतून धनादेश काढून त्यावर पुढील प्रक्रिया करतात. ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान काही ग्राहकांनी बँकेला तक्रारी केल्या, ज्यात त्यांनी सांगितले की, २२ व २३ ऑक्टोबर रोजी वटवले गेलेले धनादेश आणि डिमांड ड्राफ्ट त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यानंतर बँकेने तपासणी केली असता, कोणतीही तांत्रिक चूक आढळून आली नाही. मात्र, पुढील तपासात हे लक्षात आले की, त्या धनादेशांवरील नाव रासायनिक पद्धतीने मिटवून बोगस व्यक्तीचे नाव लिहून, त्या धनादेशांचा वापर इतर राज्यांतील बँकांमध्ये झालेला आहे. बँकेने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि दोन वेगवेगळ्या व्यक्तींना बँकेच्या चेक ड्रॉप बॉक्समधून धनादेश काढताना आणि बॉक्सचे कुलूप पूर्ववत लावतानाचे स्पष्ट दिसले.

मुख्य प्रबंधक विमलेश कुमार वर्मा यांच्या फिर्यादीवरून शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने