भुसावळ बाजारपेठ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरातील सोमनाथ नगर येथील श्री अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात 2 डिसेंबर 2024 रोजी रात्री 14.00 ते 22.00 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातील 33 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2,60,000/- रुपये रोख चोरले. यामुळे एकूण 28,55,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. यावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार केले. पथकाला गुप्त माहिती मिळाली की, ब-हाटे यांचा जवाई राजेंद्र शरद झांबरे याला कर्जबाजारी असल्याचे समजले. पोलिसांनी झांबरे याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. चौकशीत झांबरे ने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या कडून चोरीला गेलेले 23 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2,60,000/- रुपये रोख हस्तगत करण्यात आले. झांबरे याने इतर 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने देखील चोरी केल्याचे कबूल केले. यावरुन एकूण 28,55,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक श्री राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी आणि जावेद शहा यांच्या कडून केली गेली.
टिप्पणी पोस्ट करा