Top News

जळगाव जिल्ह्याच्या स्पर्धकांनी नाशिक विभागीय युवा महोत्सवात वर्चस्व राखल

जळगाव जिल्ह्याने विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले विजेतेपद,

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नाशिक विभाग यांच्या वतीने नाशिक विभागीय युवा महोत्सव 10 डिसेंबर रोजी जळगाव येथे पार पडला. हा महोत्सव छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आला.  

महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नयना महाजन झोपे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक, ॲडव्होकेट श्रीमती भारती कुमावत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व, कथालेखन, कविता लेखन, चित्रकला, विज्ञान संशोधन प्रकल्प इत्यादींचा समावेश होता. जळगाव जिल्ह्याने या स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व दाखवले.

विजेत्यांची नावे
लोकगीत स्पर्धा

  - 1. कान्ह ललित कला केंद्र, जळगाव
  - 2. पूज्य साने गुरुजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार
  - 3. एपीजे कला वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी, नाशिक

वक्तृत्व स्पर्धा

  - 1. जिज्ञासा गणेश पाटील, जळगाव
  - 2. विवेक मनोज पाटील, जळगाव
  - 3. आकांक्षा विजय सोनवणे, धुळे

कथा लेखन स्पर्धा
  - 1. ऐश्वर्या प्रल्हाद पाटील, जळगाव
  - 2. पवन सुभाष सावकारे, जळगाव
  - 3. विशाल रमेश गावित, नंदुरबार

कविता लेखन स्पर्धा
  - 1. रसिका मुकुंद ढेपे, जळगाव
  - 2. अथर्व विश्वास केळकर, नाशिक
  - 3. अंजली सुभाष माळी, नंदुरबार

चित्रकला स्पर्धा
  - 1. कुणाल विष्णू जाधव, जळगाव
  - 2. समय अजय चौधरी, जळगाव
  - 3. तेजस अनिल चौधरी, नाशिक

लोकनृत्य स्पर्धा
  - 1. कान्ह ललित कला केंद्र, जळगाव
  - 2. एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल, नंदुरबार
  - 3. एम के शिंदे विद्यालय, कुसुंबा, धुळे

कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व विजेत्यांना प्रसिद्ध कलाकार श्री हेमंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर, कार्यक्रमासाठी क्रीडा अधिकारी श्री. सुरेश थरकुडे, श्री. सचिन निकम, श्री. विशाल बोडके, प्रा. प्रसाद देसाई, एम.जे. महाविद्यालय, जळगाव, श्री. जगदीश चौधरी आणि अन्य कार्यकर्त्यांनी आपले परिश्रम घेतले.

सर्व विजयी संघ 13 डिसेंबर 2024 पासून नांदेड येथे सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने