Top News

Breaking I जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासकीय फेरबदल; मीनल करणवाल यांची बदली, करिश्मा नायर नव्या सीईओ

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबई येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (शासकीय संस्था) बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयाकडून उशिरा रात्री या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

मीनल करणवाल यांची उल्लेखनीय कारकीर्द
गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कार्यकाळात मीनल करणवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवले. ग्रामीण विकास, प्रशासकीय शिस्त आणि निर्णयक्षमतेमुळे त्यांची कारकीर्द विशेष ठरली. त्यांच्या बदलीमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

करिश्मा नायर यांच्यावर मोठी जबाबदारी
जळगाव जिल्ह्याला करिश्मा नायर यांच्या रूपाने एक तरुण, ऊर्जावान आणि कर्तव्यदक्ष महिला अधिकारी लाभली आहे. २०२१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या नायर यांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये बी.एस्सी. पदवी प्राप्त केली आहे.

करिश्मा नायर यांचा परिचय

जन्म: २७ नोव्हेंबर १९९७

शिक्षण: बी.एस्सी (फॉरेन्सिक सायन्स)

अनुभव: प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले असून, २ एप्रिल २०२५ पासून नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.


जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे मोठे आव्हान आता करिश्मा नायर यांच्यासमोर आहे. मीनल करणवाल यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वेग कायम राखण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने