रोहिणी खडसे यांना विधानसभेत पाठवा, केळी विकास महामंडळ स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी - अविनाश पाटील यांचे मतदारांना आवाहन
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी – मुक्ताईनगर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या रोहिणी खडसे यांनी प्रचार दौऱ्यातून मतदारसंघातील ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले. वाघाडी, धामोडी, रेंभोटा, कांडवेल, कोळोदा आणि इतर गावांमध्ये मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या दौऱ्यात शिवसेना (उबाठा गट) तालुकाध्यक्ष अविनाश पाटील यांनी, “मतदारसंघातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी विकास महामंडळाची गरज आहे आणि रोहिणीताई खडसे यांच्या विजयाने हे स्वप्न साकार होईल,” असे मत व्यक्त केले. तसेच, खडसे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी विधानसभेत आपले प्रश्न मांडण्याची ग्वाही दिली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी देखील मतदारांना रोहिणीताईंच्या विजयासाठी मतदान करण्याचे आवाहन केले, तसेच त्यांचे मागील निवडणुकीतील प्रयत्न आणि कार्याची प्रशंसा केली.
टिप्पणी पोस्ट करा