Top News

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आशीर्वाद घेत, डॉ. अश्विन सोनवणे यांनी जळगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

जळगाव शहरातील अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला; माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या आशीर्वादाने निवडणुकीत उतरण्याची तयारी

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, राजकीय दिग्गजांना धक्का देण्यासाठी अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातही, डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी नारळ फोडून आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला.

डॉ. अश्विन सोनवणे यांनी राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेत आपल्या प्रचारास सुरुवात केली. या वेळी त्यांच्या सोबत राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे, विशाल सोनवणे, जित सोनवणे, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांसारखे समर्थक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव शहराच्या विकासासाठी लढण्याची तयारी करत, डॉ. सोनवणे यांनी या निवडणुकीत नागरिकांचे आशीर्वाद मिळवण्याचा निर्धार केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने