जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एरंडोल पारोळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांच्या प्रचारार्थ लावलेले पारोळा येथील अनोखे बॅनर हे जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एरंडोल मतदारसंघातील पाणी प्रश्न हा दीर्घकाळाचा आहे, आणि याच पाणी समस्येला प्रमुख निवडणूक मुद्दा बनवत डॉ. संभाजीराजे विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पकतेचा वापर करून मतदारांचे लक्ष वेधून घेतात. याचाच एक अनोखा उदाहरण म्हणून डॉ. संभाजीराजे यांनी पाणी प्रश्नाकडे मतदारांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी पारोळा येथे 3D बॅनर लावले आहे. हे बॅनर विशेषतः खाली ठेवलेले पाणी भांडे वापरून तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे ते राहणाऱ्यांचे आणि जाणाऱ्यांचे लक्ष सहज आकर्षित करत आहेत.
या बॅनरमुळे एक वेगळ्या प्रकारची जागरूकता निर्माण झाली आहे, आणि दिवसभर सोशल मीडियावर यावर चर्चा होत आहे. स्थानिक लोकांमध्ये ते चर्चेचा विषय बनले असून, बॅनरची कल्पकता आणि त्यात दाखवलेला पाणी प्रश्नातील गंभीरता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा