Top News

जळगावातील तांबापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भव्य जाहीर सभा


नागरिकांनी दिली उमेदवार कुलभूषण पाटील यांना मतदानाची ग्वाही, आशाबाबा नगर आणि सद्गुरू नगरमध्ये आयोजित मिटिंगमध्ये नागरिकांनी एकजुटीने "कपाट" चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचा निर्धार केला.

जळगाव अपडेट न्युज, निखिल वाणी I विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तांबापूर भागात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी आशाबाबा नगर व सद्गुरू नगर येथील नागरिकांसाठी कॉर्नर मिटिंगचे आयोजन करण्यात आले. सभेला व मिटिंगला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभा व मिटिंगमध्ये स्थानिक नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या धोरणांवर प्रकाश टाकला. यावेळी नागरिकांनी अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांच्या चिन्हासमोरील "कपाट" या बटन दाबून मतदान करण्याची ग्वाही दिली आणि एकजुटीने निवडणुकीत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी उपस्थित असलेल्या नेत्यांनी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यांनी मतदानाच्या महत्त्वावर भर दिला. नागरिकांनीही आपला मतदान हक्क बजावण्याचा निर्धार केला.

त्याचबरोबर, सभा आणि मिटिंगच्या माध्यमातून पक्षाने आपल्या वचनांचा ठोस प्रचार केला आणि तांबापूरमध्ये आगामी निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने