Top News

जळगावला सुवर्णनगरी बनवण्याची एक संधी मिळावी – जयश्री महाजन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांचा जळगाव शहरातील प्रचार दौरा, विकासाच्या अपूर्णतेवर तीव्र नाराजी व्यक्त

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नव्या आशा आणि योजनांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक १४ मध्ये आपला प्रचार सुरु केला. विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन प्रचार मोहिमेची सुरुवात केली आणि त्यानंतर नागरिकांसोबत संवाद साधला.

जयश्री महाजन यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासाबाबत असलेल्या समस्यांचा मांडणी केली. पाणीपुरवठा, रस्त्यांचे दुरवस्था आणि अपूर्ण विकासकामांचा मुद्दा उपस्थित करत नागरिकांनी विद्यमान सरकारावर असंतोष व्यक्त केला. "केवळ आश्वासनांची पूर्तता झाली, परंतु प्रत्यक्षात विकास ठप्प आहे," अशी तक्रार अनेक नागरिकांनी केली.

महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले, “आम्ही एक संधी दिल्यास जळगावच्या प्रत्येक प्रभागात विकासाचा प्रकाश पोहोचवू आणि शहराला सुवर्णनगरी बनवण्याची वचनबद्धता घेतो.” त्यांच्या भावनिक आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि महाजन यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करण्याचे आश्वासन दिले.

महाजन यांच्या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. त्यात महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील आणि इतर नेत्यांचा समावेश होता. जयश्री महाजन यांच्या प्रचार मोहिमेने जळगावकरांच्या मनात विकासाची आशा जागवली असून आगामी निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने